Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडआरोग्य प्रशासन अलर्ट; तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी शंभर बेड

आरोग्य प्रशासन अलर्ट; तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी शंभर बेड


बीड (रिपोर्टर:- एकीकडे कोरोनाची लाट ओसरत आहे, दुसरीकडे तज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका हा लहान मुलांना असल्याचे संकेत दिल्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयाने त्यासाठी तयारी दाखवली असून लहान मुलांच्या उपचारासाठी दोन वार्ड तयार करण्यात आले असून यात शंभर ऑक्सिजन बेड, ८४ वेंटि एनआयव्ही बेड आणि ४६ एमआयसी बेड तयार करण्यात आले आहेत. तज्ञ डॉक्टरांनाही तात्काळ या कामी लावण्यात आले असून म्युकर मायकोसिसबाबतही जिल्हा रुग्णालय दक्ष असून त्यासाठीही वेगळा वार्ड जिल्हा रुग्णालयामध्ये तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी रिपोर्टरला सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी आला असून तिसर्‍या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. ही तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचेही तज्ञांनी म्हटलेले आहे. त्यामुळे मुलांना बाधा होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात असले तरी मुलांना बाधा झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात वार्ड क्र. ५ आरक्षित करण्यात आले आहे. याठिकाणी शंभर बेड ओटुचे, ८४ बेड वेंटी आणि एनव्हाचे व ४६ बेड एमआयसीचे निर्माण करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या तीन बालरोग तज्ञ आहेत. गरज पडल्यास इतर डॉक्टरांना पाचारण केले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी दिली आहे. म्युकर मायकोसिस या आजाराबाबतही आरोग्य प्रशासन दक्ष आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण अंबाजोगाईला पाठवले जात होते आता मात्र जिल्हा रुग्णालयातच त्याचे निदान करून याच ठिकाणी त्यावर उपचार केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र ३० बेडची निर्माण करण्यात आली. या रुग्णांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार असल्याचेही डॉ. गित्ते यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!