Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडकेजदोनच कर्मचार्‍यांवर चालतो यूसुफवडगाव महाराष्ट्र बँकेचा कारभार

दोनच कर्मचार्‍यांवर चालतो यूसुफवडगाव महाराष्ट्र बँकेचा कारभार


केज (रिपोर्टर):- राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने कामकाज करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यातच पीक कर्ज असेल किंवा इतर व्यवहार तात्काळ होत नाहीत. यूसुफवडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत केवळ दोनच कर्मचारी असल्याने या दोन कर्मचार्‍यांवर कसा कारभार व्हायचा, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सदरील बँकेत कर्मचार्‍यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील युसुफवडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत आजस्थितीत दोन कर्मचारी कार्यरत आहेत. या दोन कर्मचार्‍यांवर संपुर्ण बँकेचा कारभार चालत आहे. इतर दोन कर्मचारी सुट्टीवर असल्यामुळे या दोन कर्मचार्‍यांवरच कामाचा ताण पडला. शाखा व्यवस्थापक देशमाने व कॅशिअर इजळकर हे दोन कर्मचारी सध्या कार्यरत असल्याने अन्य कर्मचार्‍यांची वरिष्ठांनी भरती करून बँकेचा कारभार सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पिक कर्जाचे वाटप सुरू आहे यासह अन्य व्यवहारही बँकेत मोठ्या प्रमाणात होत असतात. असे असताना दोन कर्मचार्‍यांवर कसा कारभार चालायचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!