Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमसासर्‍याने केला सुनेचा विनयभंग

सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला केले अटक
बीड (रिपोर्टर):- सासर्‍याने चक्क सुनेचा विनयभंग करून नात्याला काळीमा फासल्याची घटना शहरातील इंदिरानगर भागात घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


प्रभाकर वामन ससाणे (वय ६५) या सासर्‍याने आपल्या सुनेचा विनयभंग केला. या प्रकरणी सुनेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ससाणे विरोधात कलम ३५४ (अ), ३२३, ५०४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे, शिवाजी कागदे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!