Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमबीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना

बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना

महिलांवरील अन्याय-अत्याचाराचा तपास पथक करणार
बीड (रिपोर्टर):- महिला-मुलींवरील अन्याय-अत्याचाराच्या तपासासठी स्पेशल ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, गेवराई, केज, अंबाजोगाई या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. या पथकामध्ये महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महिला आणि मुलींवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी गृह विभागाने ठोस पावले उचलली. अन्याय-अत्याचाराचा तपास करण्यासाठी स्पेशल पिंक मोबाईल पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस ठाण्यामध्ये जे काही गुन्हे दाखल होतील ते गुन्हे या पथकाकडे वर्ग करायचे त्यानंतर हे पथक त्या त्या गुन्ह्याचा तपास करणार आहे. बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, गेवराई, केज, अंबाजोगाई या सहा ठिकाणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सदरील पथकात महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात इतर कर्मचार्‍यांचीही या पथकामध्ये नियुक्ती राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!