Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठा उठला आरक्षणासाठी, शाहू महाराजांच्या समाधीस्थळी बसला

मराठा उठला आरक्षणासाठी, शाहू महाराजांच्या समाधीस्थळी बसला

कोल्हापूर (रिपोर्टर):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी खा. संभाजीराजेंनी ‘आम्ही बोललो, आता तुम्ही बोला,’ असं म्हणत मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनास राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या वेळी सत्तेतील अनेक मंत्र्यांसह आमदारांनी आरक्षणाविषयाची आपली बाजू मांडली. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह अनेक आमदार, खासदारांनी आंदोलनस्थळी येऊन आपल्या भूमिका मांडल्या. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला, आता हा आवाज दिल्लीपर्यंत जायला हवा, असे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले.

हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं.

वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्‍न सोडवू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती. , असं हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्‍न आम्ही पूर्ण करणार,  वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्‍न सोडवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना दिली.
संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक, चर्चा करुन मार्ग काढूया : सतेज पाटील
संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. संभाजीराजे यांना उद्याच्या उद्या वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही, असं आश्‍वासन कोल्हापूरचे पालकमंत्री  सतेज पाटील यांनी दिलं. कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे आंदोलन ज्या उद्दिष्टाने सुरु केलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जावं. सरकारने काही केलं नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र कोर्टाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

चंद्रकांत पाटलांकडून संभाजीराजेंना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द
कोल्हापुरातील आंदोलनस्थळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली. यावेळी चंद्रकांत पाटलांकडून संभाजीराजेंना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांच्याकडून संभाजीराजेंवर सातत्याने टिप्पणी केली जात होती.

मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती आपल्या निवासस्थानाहून आंदोलनस्थळी रवाना झाले आहे. मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्‍वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा

Most Popular

error: Content is protected !!