बीड (रिपोर्टर) नेकनूरच्या बाजारातून उदगीरला एका आयशरमध्ये बारा बैल कोंबून त्याची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी केज येथे धारूर चौकात आयशर टेम्पो ताब्यात घेऊन बारा बैलांची सुटका केली. या प्रकरणी केज पोलिसात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनूरच्या बाजारातून बारा बैल घेऊन एक टेम्पो उदगीरच्या दिशेने जात असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यांनी आपले पथक पाठवून केज शहरातील धारूर चौकात सापळा रचून आयशर टेम्पो ताब्यात घेतला. त्यामध्ये बारा बैल कोंबून भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची सुटका करून तिघा जणांवर केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालाजी दराडे यांच्यासह आदींनी केली.