बीड, शिरूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते जाणार-आ.क्षीरसागर
बीड (रिपोर्टर) उद्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व नेते उपस्थित राहणार असून बीड मतदार संघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे महिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या कोरोना काळात मराठवाड्यातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन जनतेशी कायम बांधीलकी ठेवून विकासकामांना खिंड पडु दिली नाही. विशेषतः बीड जिल्ह्यातील आणि बीड मतदार संघात विकास कामांसाठी आणि कोरोना काळात बीड जिल्हा रूग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महाविकास आघाडीच्या काळातील राबविलेल्या योजनांची व सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे महाविकास आघाडीचे जाहिर सभा दि.2 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होत आहे. या सभेस मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री यांच्यासह लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून बीड मतदार संघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी महिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.