किल्लेधारूर (रिपोर्टर) धारुर घाटात बर्निंग कारचा थरार आज दि.1 एप्रिल शनिवारी सकाळी नऊ वाजता अनेकांनी अनुभवला. माजलगावकडे जाणारी टाटाची कार घाटात एका वळणावर अचानक पेटली असून सुदैवाने यात कसलीही जिवितहानी झालेली नाही. पेटती कार गेर तुटल्याने मोटरसायकलला धडकली पेटती कार खाली गरनगळत खाली येत असलेली पाहून प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती
सतत अपघाताच्या घटनांनी प्रसिध्दीस येत असलेल्या धारुर घाटात आज पेटत्या कारचा थरार अनेकांनी अनुभवला. घाटाच्या पायथ्याजवळील वळणावर टाटा कंपनीची इंडीगो कार क्र. एमएच 14 सीएस 5382 आज सकाळी 9 च्या सुमारास माजलगावकडे जात असताना अचानक पेट घेतला. सदर कार पेटलेल्या अवस्थेत असताना मात्र जवळपास बघ्यांची मोठी गर्दी होती. कार कोणाची होती? कशामुळे पेटली? कारमध्ये कुणी होते का? याची माहिती मिळू शकली नाही. सुदैवानेत कुठली जीवित हानी न झाल्याने प्रशासन तसेच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे