Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमचुंबळी फाट्यावर कारचा अपघात; एक ठार एक जखमी

चुंबळी फाट्यावर कारचा अपघात; एक ठार एक जखमी

समाजसेवक मुन्ना अन्सार
जखमींच्या मदतीला धावून गेले

पाटोदा (रिपोर्टर): जालन्याहून बारामतीकडे निघालेली कार चुंबळी फाट्यावर एका खड्ड्यात पडली. सदरील हा अपघाताचा प्रकार समाजसेवक मुन्ना अन्सार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला.

जालना जिल्ह्यातील मंठा जिंतूर येथील उद्योगपती भोसले कुटुंबातील दोघेजण बारामतीकडे जात होते. चुंबळी फाट्याजवळ त्यांच्या गाडीला(आय२०) अपघात होवून गाडी एका खड्ड्यमध्ये कोसळली. सदरील गाडी खड्ड्यात गेल्याने समाजसेवक मुन्ना अन्सार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान यातील पुरुषोत्तम भोसले (वय ५२) हे ठार झाले तर अन्य एकास बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर मुन्ना अन्सार यांनी १०८ गाडीला संपर्क साधला होता. मात्र ही गाडी लवकर येत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत:हून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Most Popular

error: Content is protected !!