धारूर- अंबाजोगाई रस्त्यावर घडली घटना
धारूर (रिपोर्टर) रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रन देत आहेत, रस्त्यावरील खड्डे चुकवताना एका दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी धारूर-अंबाजोगाई रस्त्यावर घडली.
धारूर तालुक्यातील धारूर अंबाजोगाई रोडवरील आवरगाव येथील युवक वैयक्तिक कामासाठी 14 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेला धारूर येथे येऊन आपले काम करून परत गावी जात असताना वाटेमध्ये रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या खाली गेली व गाडीवरील एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत तालुक्यातील आवरगाव येथील तरुण बाळू गालफाडे वय 30 व बापू लोखंडे वय 30 हे एम एच 11 लष 6367 वरून प्रवास करत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सकाळी साडे आठ वाजन्याच्या सुमारास धारूरहुन आवरगाव कडे जात असताना धारूर दीड किलोमीटर अंतरावर आले असता त्यांच्या गाडीवरचा अचानक ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या ढिगार्यावर जाऊन गाडी जाऊन खाली आधळल्याने ते खाली कोसळले व बाळू गालफाडे च्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला व बापू लोखंडे यांच्या गुडघ्याला जबर मार लागला आहे त्याला अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत,बाळू गालफाडे च्या पाश्चात पत्नी व मुलगी आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे