परळी (रिपोर्टर) डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेच्या वतीने सोमवार दि 17 रोजी सकाळी 11 वा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगाराच्या दारात मरण घेऊन आलेल्या 14 मार्च 2023 चे परिपत्रक रद्द करा, म्हणून सदरील परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी करण्यात आली .नोकर भरती व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय संघटना आक्रमक झाली असून परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने 14 मार्चच्या परिपत्रकाचे होळी करून सरकारचा निषेध करण्यात सरकारी नोकरीचे खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (ऊधऋख) या युवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत.या निदर्शने मोर्च्याला शुभेच्छापर पाठींबा देताना किसान सभेचे बीड जिल्हाधक्ष कॉ. अजय बुरांडे हे म्हणाले की आता शेतकर्यांची मुले मूलभूत प्रश्नांना ओळखू लागली आहेत. जात-धर्म,मंदिर-मज्जिद या मुद्द्यांना सोडून ते आता रोजगार, आरोग्य,शिक्षण यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.