Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमलवुळमध्ये मजुराचे घर फोडले, सोन्या चांदीसह नगदी ऐवज लंपास

लवुळमध्ये मजुराचे घर फोडले, सोन्या चांदीसह नगदी ऐवज लंपास


बीड (रिपोर्टर):- माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लऊळ येथील एका मजुराचे काल रात्री २ चोरट्याने घर फोडून घरातील सोन्या चांदीसह नगदी असा एकूण ११ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.
शेषनारायण व्यंकटी शेंडगे रा.लऊळ ता.माजलगाव यांच्या घरी काल रात्री अज्ञात दोन चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करत रॅकमध्ये ठेवलेले सोन्याचे दोन ग्रॅमचे मणी व पेटीत ठेवलेले तीन हजार रूपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार आयतवार हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!