Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमटपरी फोडून ६४ हजाराचा मुद्देमाल पळवला

टपरी फोडून ६४ हजाराचा मुद्देमाल पळवला


बीड (रिपोर्टर):- शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माने कॉम्प्लेक्स समोरील टपरी अज्ञात चोरट्याने फोडून टपरीत असलेला ऍप्पल कंपनीचा एक मोबाईल, २२ हजाराचे सिगारेट व गल्ल्यातील रोखरक्कम असा एकूण ६४ हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी विशाल किसनराव गाडे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गाडे यांच्या आईची तब्येत खराब असल्याने ते टपरी बंद ठेवून आईला दवाखान्यात घेवून गेले होते. याचाच फायदा चोरट्याने घेवून टपरी फोडली.

Most Popular

error: Content is protected !!