Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमधावत्या वाहनातून किटक नाशकाचे बॉक्स पळविले

धावत्या वाहनातून किटक नाशकाचे बॉक्स पळविले


नेकनूर (रिपोर्टर)- धावत्या वाहनाची ताडपत्री फाडून वाहनातील किटक नाशकाचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना येळंबघाट पुलावर मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या प्रकरणी ज्ञानेश्‍वर धोंडीराम लव्हे (रा. निटूर ता. निलंगा) या चालकाच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हैद्राबाद येथून टेम्पो (क्र. एम.एच. २४ ए.यु. २७७३) ने लातूरला किटक नाशक औषधे घेऊन जात असताना येळंबघाट येथील पुलावर अज्ञात चोरट्याने धावत्या टेम्पोची ताडपत्री फाडून आतील किटक नाशकाचे ६ बॉक्स (किंमत ४४ हजार ७९०) काढून घेतले. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना. दिपक खांडेकर हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!