Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडनेकनूरमध्ये दिवसाढवळ्या चोरी साडे सहा तोळे सोने पळविले

नेकनूरमध्ये दिवसाढवळ्या चोरी साडे सहा तोळे सोने पळविले

नेकनूर (रिपोर्टर)- घरी कोणी नाही या संधीचा फायदा उचलून नेकनूर येथे शिक्षक कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी घर फोडून आतील साडे सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भगवानसिंग रामसिंग पुरोहित (रा. शिक्षक कॉलनी, नेकनूर) हे काल दुपारच्या दरम्यान खरेदीसाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने घरातील साडेसहा तोळ्याचे दागिने चोरून नेले. परत आल्यानंतर आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास जाधव, खांडेकर हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!