Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडपरळीपरळी शंभर टक्के बंद

परळी शंभर टक्के बंद

परळी (रिपोर्टर)-उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खैरी घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये परळी शहरातील सर्व व्यापार्‍यांनी सहभाग घेतला. परळी शहर शंभर टक्के बंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध करत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.


सकाळपासूनच व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्त बंदमध्ये सहभाग नोंदवत आपआपली दुकाने बंद ठेवली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करत दोषींविरोधात कठोर कावाई करण्याची मागणी केली. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचेही कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!