मनोज जरांगेंच्या 90 वर्षाच्या मातोश्री रस्त्यावर
मातोरीच्या चक्काजाममध्ये सहभागी
सराटे अंतरवली येथे गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे मूळचे गेवराई तालुक्यातील मातोरी येथील असून त्यांच्या 90 वर्षीय मातोश्री प्रभावती रावसाहेब जरांगे यांनीही आज रस्त्यावर उतरून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. हात जोडून सर्वांना अभिवादन करत पानावलेल्या डोळ्यांनी प्रभावती यांनी सरकारला मराठा समाजासाठी आरक्षण द्या, असे म्हटले. आंदोलनस्थळी हात जोडण्यासाठी त्या जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा समाज बांधवांनी त्यांना सहारा दिल्याचे छायाचित्रात दिसत होते.