Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमकवडगाव येथील शेतकर्‍याची आत्महत्या

कवडगाव येथील शेतकर्‍याची आत्महत्या


वडवणी (रिपोर्टर):- सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कवडगांव येथील 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विष पाषण करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
दिलीप शेषेराव शेजाळ वय-35 वर्षीय शेतकरी यांनी सतत होणारी शेतातील नापिकी तर कधी निसर्गाची अवकृपा आणि कुंटुब प्रंपचासाठी घेतलेले कर्ज याला कंटाळून काल रहत्या घरीच काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विष पाषाण केले.यात शेजाळ यांना बीड येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारा दरम्यान आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला असून त्यांना फक्त अर्धा एकर शेती आसून ते दुसऱ्या शेतकऱ्यांची बटईने शेती करत होते असे सांगण्यात आले आहे.तर दिलीप शेजाळ यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुल,एक मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!