Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात 65 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

बीड जिल्ह्यात 65 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू


बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने जिल्ह्यात केवळ 65 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आज आलेल्या अहवालात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 1 लाख 471 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दुसर्‍या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात झपाट्याने कमी झाली. सध्या 10 ते 15 पॉझिटिव्ह रुग्ण रोज जिल्ह्यात आढळून येत आहेत. त्यामुळे उपचाराखालील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून कालच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 65 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. आज यामध्ये 10 रुग्णांची भर पडली असली तरी रोज कोरोनावर मात करणार्‍यांची संख्याही मोठी असते. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 1 लाख 3 हजार 348 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2 हजार 809 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकूण 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 869 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्हमध्ये आष्टी 3, बीड 3, धारूर 1, केज 2 आणि पाटोदा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये सहवासातील दोन रुग्ण असून इतर सर्व रुग्ण नवीन आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!