गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरातील कोल्हेर रोडवर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम एकाने फोडले असून एटीएम मशीनची फोडाफोड करून नुकसान केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून एटीएम फोडणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई शहर पोलीस ठाण्यात विशाल दत्तू बेदरे (रा. कोल्हेररोड गेवराई) याच्या विरुद्ध दत्तात्र्य माणिकराव वेदपाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. बेदरे याने विटाच्या सहाय्याने एटीएमच्या दरवाज्याची काच फोडत मशीनची तोडफोड केली. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले आहे. पुढील तपास गेवराई शहर पोलीस करत आहेत.