Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडजाणीवपुर्वक दोन कृषी दुकानदारांवर कारवाई

जाणीवपुर्वक दोन कृषी दुकानदारांवर कारवाई

जिल्हा गुण नियंत्रण अधिकार्‍याची दादागिरी


पाटोदा (रिपोर्टर) कृषी विभागा मार्फत मिळणार्‍या योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवत शेतकर्‍याच्या कोर्‍या कागदावर सह्या घेऊन त्या सहीच्या आधारे कृषी दुकानदाराविरोधात शेतकर्‍याची तक्रा भासवून कृषी दुकानावर छापा मारत सुडबुद्धीने जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी यांनी कारवाई केल्याचे उघड झाले. या प्रकरणी कृषी दुकानदारासह शेतकर्‍याने संबंधित अधिकार्‍या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.


बीड जिल्हा कृषी गुण नियंत्रण अधिकारी यांनी पाटोदा येथील शिवराज कृषी सेवा केंद्राला बदनाम करण्याहेतु 19 ऑक्टोबर रोजी छापा मारला. या वेळी दुकानात कुठलेही अवैध अथवा बनावट मिळून आले नाही. दुकानदारावर काहीच कारवाई करता येत नसल्याचे पाहून संबंधित अधिकारी यांनी बेलेवाडी येथील बाळु हरिभाऊ शिंदे या शेतकर्‍याच्या घरी जावून कृषी विभागामार्फत योजनेचा लाभ मिळवून देतो, म्हणून संबंधित शेतकर्‍याच्या कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या. 21 ऑक्टोबर रोजी जेव्हा हा शेतकरी कृषी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेला असता त्याच्या सह्या केलेला कागदही त्या ठिकाणी नव्हता आणि योजनाही नव्हती. त्यामुळे सह्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून संबंधित शेतकर्‍याने तक्रार केली होती. परंतु त्या शेतकर्‍याच्या सह्याच्या आधारे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी यांनी पुन्हा कृषी दुकानावर खोट्या कारवाया केल्या. पाटोदा येथील शिवराज कृषी केंद्रावर जशी कारवाई केली तशीच तालुक्यातील कारेगाव येथील मंजूर कृषी सेवा केंद्र यांच्यावरही कारवाई केली. सदरची कारवाई ही जाणीवपुर्वक करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपुर्वी मंजूर कृषी केंद्राचे मालक सय्यद मंजूर यांचे चुलते सय्यद मन्सूर पटेल यांनी कृषी विभागातील एका भ्रष्ट अधिकार्‍याला एसीबीच्या जाळ्यात अडकवले, म्हणून खोट्या कारवाया केल्याचे दिसून येते. संबंधित जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!