Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमपिंपळनेरमध्ये घरफोडी दोन तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास

पिंपळनेरमध्ये घरफोडी दोन तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास


बीड (रिपोर्टर):- पिंपळनेर येथे रात्री चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून घरातील रोख रक्कमेसह दोन तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


पिंपळनेर येथील आखाडे हे ऊसतोडणीसाठी गेले असून त्यांच्या पत्नी घरी राहतात. रात्री त्या एका रूममध्ये झोपल्या असता दुसर्‍या रूमचा दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले नगदी 10 ते 15 हजार रूपये व दोन तोळे सोने लंपास केले. सकाळी आपल्या घरी चोरी झाल्याचे आखाडे यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाणे गाठत त्याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख बाळासाहेब आघाव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Most Popular

error: Content is protected !!