Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा रुग्णालयातील 50 कर्मचारी उशिरा आले कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे आर्धे वेतन कपात...

जिल्हा रुग्णालयातील 50 कर्मचारी उशिरा आले कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे आर्धे वेतन कपात करण्यात येणार

बीड (रिपोर्टर)ः- जिल्हा रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी वेळेवर येत नाही. कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवाही वेळेवर मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे हे प्रयत्न करत आहे. आज डॉ.साबळे यांनी कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवत कोणता कर्मचारी कधी आला याची स्वतः पाहणी केली. 50 कर्मचारी उशिरा आल्याचे निर्देशनास आल्यानंतर या सर्व कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे आर्धे वेतन कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय डॉ.साबळे यांनी घेतला आहे.
जिल्हा रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर, कर्मचारी, नर्स वेळेवर येत नाहीत. वेळेवर येण्याच्या तशा सुचना डॉ.सुरेश साबळे यांनी अनेक वेळा दिलेल्या आहेत. काही कर्मचारी कामचुकारपणा करतात. आज सकाळी डॉ.सुरेश साबळे यांनी कर्मचार्‍यांकडे लक्ष ठेवत कोण कधी येतयं याची पाहणी केली. 50 कर्मचारी उशिरा आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साबळे हे गेटवरच थांबलेले होते. उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना दंड म्हणून त्यांचा एक दिवसाचा आर्धा पगार कपात करण्यात येणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!