नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांच्या निवडीनंतर आता उपसरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या उपसरपंचाची निवड होण्याची शक्यता आहे. उपसरपंच म्हणून सय्यद साजेद अली यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. साजेद अली हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रा.पं. सदस्य म्हणून काम करतात. त्यांचे सामाजिक कार्य नेकनूरमध्ये मोठे असल्यामुळे त्यांचीच वर्णी लागणार आहे.
नेकनूर ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. ही निवडणूक अटीतटीची झाली, ग्रा.पं. धनंजय मुंडे यांचे खंदेसमर्थक नारायण शिंदे यांच्या ताब्यात आली. 17 पैकी 9 सदस्य आणि सरपंच शिंदे यांच्या गटाचा निवडून आला. दोन सदस्य शिवसंग्राम आणि दोन सदस्य आ. क्षीरसागर गटाचे विजयी झाले. 2 अपक्ष विजयी झाले. सरपंचपदाच्या निवडीनंतर उपसरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या उपसरपंचपदाची निवड होणार असून उपसरपंच म्हणून सय्यद साजेद अली बाबूभाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सय्यद साजेद अली हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रा.पं. सदस्य आहेत, त्यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांचीच उपसरपंचपदी निवड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.