——————-
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील 104 गावात आत्तापर्यंत 3 हजार 312 कुणबी नोंदी या मोडीलीपीत आढळल्या आहेत. दरम्यान या मोडीलीपी चे मराठी भाषांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या नोंदी भाषांतरासह आठ दिवसांत शासनाच्या लशशव.र्सेीं.ळप या पोर्टलवर प्रशासनाकडून अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे या नोंदी शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्यास मराठा समाज बांधवांना कुणबी नोंदी पाहण्यासाठी मदत होणार असून कुणबी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी अर्ज अर्ज करता येणार आहेत.
राज्यात मागील दोन महिण्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला तात्काळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी होत असतानाचा निजामकालीन कुणबी नोंदी ठिकठिकाणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा हा कुणबीच असल्याचे स्पष्ट झाले. शासनाकडून देखील कुणबी नोंदी तपासण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. दरम्यान गेवराई तालुक्यात आत्तापर्यंत 104 गावात 3 हजार 312 कुणबीच्या नोंदी या मोडीलीपीत आढळून आल्या आहेत. याबाबत गेवराई तहसील कार्यालयात दि. 22 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी जाधवर मॅडम यांच्यासोबत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी आढळलेल्या कुणबी नोंदी भाषांतरासह लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपबाबत चर्चा देखील झाली. यामध्ये तालुक्यात दसर्याच्या दिवशीपासून आजपर्यंत सापडलेल्या 104 गावच्या एकूण 3 हजार 312 कुणबी नोंदी भाषांतर करून 30 नोव्हेंबर 2023 तारखेपर्यंत लशशव.र्सेीं.ळप या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जाधवर मँडम यांनी सांगितले. तर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावल नोटरी करण्याची गरज नाही, ऑनलाईन फाईल अपलोड केल्यावर ऑफलाईन फाईल मागणी धारकाने फिरविण्याची गरज नाही, पहिल्याप्रमाणे विहित वेळेत प्रमाणपत्र दिले जाईल, भूमिअभिलेखचे गाव नमुना 33 व 34 च्या प्रामाणित कॉपी सकल मराठा समजाला देण्याचे ठरले या बैठकीत ठरले आहे. यामुळे कुणबी नोंदीचे भाषांतर झाल्यानंतर वंशावळीनुसार मराठा बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र काढता येणार आहेत. या बैठकीला तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, मोडीलीपी तज्ञ नितीन डोळे, डॉ. उध्दव घोडके आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
000000