आष्टी (रिपोर्टर):- बीड कडून अहमदनगर कडे जात असलेल्या ट्रकने पुण्याहून नांदेडला निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्सच्या बसला हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स खड्यात कोसळून अपघात घडला सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप सुरक्षित आहेत. हा अपघात बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे आज पहाटे एक वाजेच्या दरम्यान घडला
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माऊली ट्रॅव्हल्सची एक बस ( एम.एच क्रमांक 22.3867 ) पुण्याहून 40 प्रवाशांना घेऊन घेऊन बीडमार्ग नांदेडला जात होती. तर बीडहून अहमदनगरकडे एक ट्रक सुसाट वेगात जात होता. पहाटे 1 वाजेच्या सुमारास बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे ट्रकने हुल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोडलगत असलेल्या खड्ड्यात गेली.सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.दरम्यान, अपघात झाल्यानंतर पहाटेच पर्यायी व्यवस्था करत प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले आहे.