• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सराटी अंतरवली येथील दगडफेक प्रकरणी बेदरेसह तीन अटक ,दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

by गणेश सावंत
November 25, 2023
Reading Time: 1 min read
0
सराटी अंतरवली येथील दगडफेक प्रकरणी बेदरेसह तीन अटक ,दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अटके दरम्यान एक पिस्टलसह दोन काडतूस जप्त
आंदोलनाला बदनाम करण्याहेतू सरकारचा हा कुठला डाव? -जरांगे
गेवराई/शहागड (रिपोर्टर): अंतरवली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारविरुद्ध आंदोलक यांनी उग्रस्वरुप धारण केले होते. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज बाबत माफी मागत गुन्हे परत घेणार असल्याचे म्हटले होते, मात्र त्यानंतर या प्रकरणात गेवराईचे ऋषीकेश बेदरेसह सनी सिरसट, कैलास सुरवसे यांना अंबड पोलिसांनी काल अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटके दरम्यान बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्टलासह दोन काडतूस जप्त करण्यात आहेत. या अटक सत्रानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारविरुद्ध मनोज जरांगे हे आमने-सामने आल्याचे पहावयास मिळत आहे. या अटकेवरून जरांगे यांनी आमचे लोक अटक करणार नाही, असं आश्‍वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमचे काही लोक अटक केले आहेत. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.


    जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. तसेच, पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला होता. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यात मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतांना जालना पोलिसांनी ऋषिकेश बेदरे यांना शुक्रवारी अटक केली आहे. तसेच, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस देखील पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बेदरे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  तत्पूर्वी लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडल्यानंतर राज्यभरात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली होती. अनेक पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सराटे अंतरवलीला भेट दिली होती. पोलिसांच्या लाठीमारात अनेक महिला जखमी झालेल्या होत्या. त्यामुळे अवघा महाराष्ट्र संतप्त होत पोलिसांच्या लाठीमारावर व्यक्त होताना दिसून येत होता. त्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमारबाबत जाहीर माफी मागितली होती. सराटे अंतरवली येथे घडलेल्या घटनेनंतर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्यात येणार, अशी सरकारकडून घोषणाही करण्यात आली होती, मात्र त्या प्रकरणात अटक सत्र अद्यापही सुरू आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या या अटक सत्रावर सरकारचा कोणता तरी डाव असल्याचे म्हटले आहे.

अटक सत्रात सरकारचा कुठला डाव? -जरांगे
आंतरवलीतले कार्यकर्ते अटक करणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करुन आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितलं होतं. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे. सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरीही अटक का केली गेली? मला या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की बोलेन. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Previous Post

बीड कडून नगरला जाणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स खड्यात कोसळली सुदैवाने जिवित हानी टळली

Next Post

कमी पावसाने कापूस, सोयाबीनचे उत्पादन घटले कापसाला 7 हजाराच्या पुढे भाव मिळेना ,कापसाला हमी भाव दहा हजार असावा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
कमी पावसाने कापूस, सोयाबीनचे उत्पादन घटले कापसाला 7 हजाराच्या पुढे भाव मिळेना ,कापसाला हमी भाव दहा हजार असावा

कमी पावसाने कापूस, सोयाबीनचे उत्पादन घटले कापसाला 7 हजाराच्या पुढे भाव मिळेना ,कापसाला हमी भाव दहा हजार असावा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?