बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाडयात यंदा पाऊस कमी झाला. याचा परिणाम खरीप पिकावर झाला असून उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं. कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही नगदी पिकं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जातात. कापसाचा उतारा अत्यंत कमी आल्याने शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला. दुष्काही परिस्थितीतही कापसाला चांगला भाव नाही. सात हजाराच्या पुढे कापूस जाईना. कापसाला भाव नसल्याने शेतकर्यांनी कापूस विक्री करणे थांबवले आहे. कापसाच्या भाव वाढीची शेतकर्यांना अपेक्षा आहे. ज्या प्रमाणात कापसाचं आहे त्या प्रमाणात सोयाबीनचं असून या दोन्ही नगदी पिकांना भाव मिळेना गेला.
बीड जिल्ह्यात खरीपाचं आठ ते साडे आठ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधीक सोयाबीनची लागवड झाली. अडीच ते पाऊणे तिन लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झालेली आहे. कापूस आणि सोयाबीन नगदी पिक म्हणून ओखळलं जातं. या पिकावरच शेतकर्याचं आर्थीक गणीत अवलंबून आहे. पाऊस कमी पडल्यामुळे खरीपाचं उत्पादन घटलं. शेतकर्यांना कापसाचा चांगला उतारा मिळाला आहे. कोरडवाहू शेतात एका बॅगला दिड ते दोन क्विंटल कापूस निघू लागला. बागायती शेतातही म्हणावा तसा कापसाला उतारा निघत नाही. दुष्काळात उत्पादन घटूनही शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. गेल्या वर्षी जो भाव होता. तोच यावर्षीही भाव आहे. सात हजाराच्या पूढे कापूस विक्री होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. यंदा कापसाला कमीत कमी दहा हजार रुपये तरी भाव असायला हवा होता. मात्र इतका भाव मिळत नसल्याने शेतकर्याचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. सात हजार भावात खर्च निघणं अवघड झालं. ज्या प्रमाणात कापसाला कमी आहे. तशीच अवस्था सोयाबीनची असून सोयाबीनला सुध्दा योग्य भाव नसल्याने सोयबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. दरम्यान राज्य सरकारने शेतकर्यांना आधार देण्यासाठी कापसाला हमी भाव दहा हजार रुपये दयायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











