Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाई…तुम्ही पत्रकारासारखे प्रश्न विचारा हो, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासारखे विचारू नका, पत्रकार परिषदेत भाजप...

…तुम्ही पत्रकारासारखे प्रश्न विचारा हो, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासारखे विचारू नका, पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवरून प्रश्न विचारताच किरीट सोमैय्यांची वळली बोबडी!

…तुम्ही पत्रकारासारखे प्रश्न विचारा हो, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासारखे विचारू नका

पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवरून प्रश्न विचारताच किरीट सोमैय्यांची वळली बोबडी!

अंबाजोगाई (रिपोर्टर ) : जगमित्र कारखाना प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमैय्यांची पत्रकारांच्या पुढे अक्षरश: बोबडी वळल्याचे पाहायला मिळाले.

भाजपच्या एका आमदाराच्या कारखान्याने 28 हजार शेतकऱ्यांच्या नावे 35 हजार कोटी रुपये कर्ज परस्पर लाटले आणि जेलमधून निवडणूक लढवली, एका माजी मंत्र्यांच्या परळी तालुक्यातील कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीचे कोट्यावधी रुपये बुडवले, कर्मचाऱ्यांनी पगार बुडवले म्हणून आंदोलन केले; नुकताच एका आमदारावर एक हजार कोटींच्या देवस्थान जमीन लाटल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे… अशा काही प्रकरणांवर का बोलत नाही, या घोटाळ्यातील पीडित सामान्य शेतकरी नाहीत का?

असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, अहो तुम्ही पत्रकारासारखे प्रश्न विचारा की, तुम्ही राष्ट्रवादी चे प्रवक्ते असल्यासारखे विचारत आहात… असे म्हणत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. मात्र भाजपकडे काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधातील ‘त्या’ गाडीभर पुराव्यांचे काय झाले, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर आम्ही पत्रकार आहोत, कोणाचेही प्रवक्ते नाहीत, पत्रकार परिषदेत आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, असे पत्रकारांनी ठासून सांगितले असता, किरीट सोमैय्यांची चांगलीच भंबेरी उडालेली दिसली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!