बीड (रिपोर्टर): महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली असून शिवसेनेच्या विभागीय नेत्यांची यादी जाहीर करत 10 नेत्यांवर राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील सोलापूर, धाराशीव, लातूर आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी पुन्हा एकदा आ. सुनील प्रभू यांच्याकडे देण्यात आली असून बीड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून ते काम पाहणार आहेत. याआधीही सुनील प्रभू यांनी बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद भूषविले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेने राज्यात संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली असून यासाठी 10 नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांची जबाबदारी आ. सुनील प्रभू यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याआधीही सुनील प्रभू यांनी बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राहून जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी केली होती. आता पुन्हा प्रभू यांच्याकडे बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद आल्याने जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार आहे.