आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
गेवराई, (रिपोर्टर)ः- मराठा आरक्षणासाठी आता पर्यंत अनेक तरूणांनी आपला बळी दिला आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे एका तरूणाने आरक्षणासाठी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी या तरूणाने चिठ्ठी लिहुन ठेवली आहे.
रामेश्वर कारभारी मते (वय 40) या तरूणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्याकेली आहे. या तरूणाने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. मराठाआरक्षणासाठी आपण आत्महत्याकरत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आज पर्यंत झालेल्या मराठा आंदोलनात या तरूणाचा सहभाग होता. या तरूणाच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी,आई वडील, भाऊ असा परिवार आहे.