चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): महिलेसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत एका अठरा वर्षीय तरुणाला टॉर्चर करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांना कंटाळून सदरील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिरूर तालुक्यातील वारणी येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय रामनाथ केदार (वय 18 वर्षे, रा. वारणी ता. शिरूर) या तरुणाला गावातीलच काही लोक तुझे आमच्या घरातील महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत त्यास जिवे मारण्याच्या धमक्या देत त्याचा सातत्याने मानसिक छळ केला जात असे. या छळाला कंटाळून विजय रामनाथ केदार याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सविता रामनाथ केदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विष्णू फुंदे, विशाल फुंदे, ऋषिकेश फुंदे, महादेव बांगर या चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.