बीड (रिपोर्टर): गोदावरी नदीच्या पात्रातून सर्रासपणे अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत आहे. नागझरीच्या उड्डाण पुलाकडे वीस-वीस फुटांचे खड्डे खोदण्यात आले असून यामुळे भविष्यात पुलाला धोका होण्याची शक्यता आहे. याची वेळीच पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
नागझरी येथील हायवे मार्गावर असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली वाळु माफियांनी वाळू उपसण्यासाठी 20 ते 25 फुटांचे मोठमोठे खड्डे खोदले. या खड्ड्यांमुळे उड्डाण पुलाला धोका निार्मण होऊ शकतो. याकडे संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी वेळीच प्रशासनाने दखल घेण्याची मागणी केली जात आहे.