चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल

बीड, (रिपोर्टर) ः तक्रार दिल्याच्या कारणावरून एकास चौघा जणांनी मारहाण केल्याची घटना नेकनूर येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अब्दुल वहाब कुरेशी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रार का दाखल केली म्हणून आरोपी सिद्दीकी कुरेशी, जावेद कुरेशी, उमर कुरेशी, सोहेल कुरेशी रा. इस्लामपुरा, नेकनूर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.





