परळी शहर पोलिसांचा अजब कारभार
परळी वैजनाथ (रिपोर्टर)ः- महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गुटखाबंदीचा आदेश काढलेला असतानाही परळी शहरात काही पानपट्टी धारक जास्ती च्या खुलेआम गुटखा विक्री होत आहे तर बीडचे अन्न भेसळ अधिकारीही तर परळी कडे फिरकत नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे परळी शहर पोलिसांनी गुटखा पकडला मात्र आम्ही मोठी कारवाई केल्याचं वरिष्ठांना भासविण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजीनगर हद्दीमधील किरकोळ पानपटटी धारकावर कारवाई करून मुख्य गुटखा माफिया कडून चिरीमिरी घेऊन सोडल्याची चर्चा परळी शहरात पसरली आहे
संबंधित गुटखा माफीया हा अंदाजे पाच ते सात तास बसून ठेवले होते सदरील गुटखा माफिया परळी शहर पोलिसांच्या सी सी टीव्ही कॅमेरा मध्ये कैद आहे मुख्य गुटखा माफिया सोडून दिल्ली चर्चा परळी झाल्यामुळे सदरील प्रकरण दडपवण्यासाठी पानपटी धारकावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे . याकडे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संबंधित चिरीमिरी घेणार्या अधिकार्यावर कारवाई करावी अशी परळीकरांची मागणी आहे या मागील खरे गौडबंगाल काय अशी ही चर्चा परळी मध्ये सुरू आहे .







