
हरवलेल्यांसाठी ऑपरेशन शोध मोहीम
बीड (रिपोर्टर): राज्यात ऑपरेशन मुस्कान सुरु केल्यापासून तब्बल 41 हजार 193 लहान मुलांचा शोध लागला आहे. आता त्या धर्तीवर हरवलेल्या महिला व बालकांसाठी राज्यात ऑपरेशन शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग सेल उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांसह बालके हरवल्याच्या घटना घडतात. यात काही तक्रारी दाखल होतात तर काही तक्रारी दाखल होत नाहीत. अशा स्थितीत आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग सेल तयार करण्यात येणार आहे. या सेलची प्रमुख एपीआय लेवलची महिला अधिकारी असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी विधानसभेत माहिती देताना म्हटले, लहान मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान आपण सुरू केले आहे, यात अतिशय चांगल्या पद्धतीने 41 हजार 191 लहान मुलांचा शोध लावला आहे.
याची दखल कोर्टाने घेतली. विशेषत: महिलांसाठी अपाण नवीन मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन शोध’ ‘मिसिंग सेल’ प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करण्यात यावे, असे म्हणत फडणविसांनी ऑपरेशन शोधच्या अंतर्गत 17.4.2025 ते 15.5.2025 या एक महिन्याच्या कालावधीत 4960 हरवलेल्या महिला आणि 1364 बालकांचा शोध लावला आहे. या व्यतिरिक्त यात 106 महिला, 703 बालक असे सापडले आहेत जे कोणत्याच रेकॉर्डवर नव्हते, ते मिसिंग होते. त्यांची मिसिंगची तक्रार देखील नव्हती. आता हा एक चांगला उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले.








