
मयत दोन दिवसांपासून गायब होता
बीड (रिपोर्टर): घरातून निघून गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी पालीच्या तलावात आढळून आला आहे. सदरील या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या तरुणाने आत्महत्या केली का काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पठार शहेबाज खान सलीम खान (वय 28 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड) हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही.त याचा आज सकाळी पालीच्या तलावात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. या तरुणाने आत्महत्या केली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.








