केज, (रिपोर्टर)ः- केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथे एका 25 वर्षीय तरूणाची तिक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार आजसकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षकांसह डीवायएसपी व केज पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदरील हा खून कोणी केला व कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समोर आलेले नाही.
विक्की उर्फ अण्णासाहेब रावसाहेब चंदनशिव (वय 25)या तरूणाचा मृतदेह आज सकाळी 10च्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तिक्ष्ण हत्याराने तरूणाचा गळा चिरल्याचे दिसून आले. घटनेची माहिती हनुमंत पिंपरी येथील नागरीकांनी केज पोलिसांना दिल्यानंतर अप्पर पोलीसअधिक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यकंकटेश देशपांडे, पोलीस निरिक्षक स्वप्नील उनवणे, महेश क्षीरसागर, उमेश निकम, इनामदार, अशोक सोनवणे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदरील हा प्रकार कोणत्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास केली पोलीस करत आहेत.











