बीड (रिपोर्टर): मागील दहा ते पंधरा वर्षापासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवर अनेक कामे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. परंतु या कामावर नियंत्रण असणार्या कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्या संदर्भात मागील 10 ते 15 वर्षापासून राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांनी संपाची हत्यार उपस्थित असून मागील 6 ते 7 दिवसापासून संप सुरू असल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमध्ये नरेगा कक्षाला टाळे दिसत असून गावपातळीवरील रोजगार हमीची कामे ठप्प झाले आहेत..
केंद्र सरकारच्या वतीने मागील 10 ते 15 वर्षाखाली गावामध्ये मजुराच्या हाताला काम मिळावे मजुराने स्थलांतर करू नये यासाठी प्रत्येक गावामध्ये तब्बल 266 कामे प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये शेतकर्यांसाठी जलसिंचन विहीर,मातोश्री पांदण रस्ता, शेत रस्ते,शिवरस्ते, जिल्हा परिषद शाळा समोर कंपाऊंड अशी विविध विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. प्रत्येक गावामध्ये रोजगार हमीची कामे सुरू झाल्यामुळे प्रत्येक गावातल्या मुजरा गावात कामे मिळू लागले या योजनेतील मागील 10 ते 15 वर्षापासून व्याप्ती वाढत गेली. या योजनेवर कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत गेले यामध्ये प्रामुख्याने एपीओ,तांत्रिक सहाय्यक अभियंता, संगणक ऑपरेटर अशा कर्मचार्यांच्या मागण्याकडे मागील अनेक वर्षांपासून राज्य सरकारने दुर्लक्ष केले. 10 ते 15 वर्षापासून हे कर्मचारी केवळ कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे हे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यासाठी सध्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत..
आंदोलन अधिक तीव्र होणार
संपूर्ण राज्यामध्ये रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत परंतु या कामावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी मात्र आपल्या मागण्यासंदर्भात ठाम आहेत. त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारने मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे 2 फेब्रुवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याची माहिती संगणक ऑपरेटर मंगेश चोरमले व योगीराज खांडे यांनी दिली आहे.








