वडवणी पोलिसांची कामगिरी ; आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
वडवणी (रिपोर्टर):- ऑल आउट ऑपरेशन मोहिमे दरम्यान वडवणी शहरात नाकाबंदीच्या वेळी पांढर्या रंगाच्या इनोव्हा गाडीत गोवंश जातीचे जनावरांची वाहतूक करताना निदर्शनास आले. सदरील गाडी थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु सदरील चालकाने पोलिसांच्याच अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या प्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनमध्ये दि. 15 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना यांना काल वडवणी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दि. 15 जून 2026 रोजी पोलीस ठाणे वडवणी येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून भारतीय न्याय संहिता, प्राण्यांचा प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमा खाली गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष दोन पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे आरोपी हे ठाणे व लातूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. दि. 21 जून रोजी तपासात आरोपी लामजना ता. औसा जि. लातूर येथे असल्याची माहिती मिळतात वडवणी पोलिसाच्या पथकाने ते धाड टाकून आरोपींना अटक केली. यामध्ये 1).अमीर आसिफ सुर्वे वय- 26 वर्ष, रा. गोविंदवाडी कल्याण वेस्ट ठाणे, 2). आमिर शबीर मेमन वय-35 वर्ष रा. अन्सारी चौक, प्पल मंजिल, कल्याण वेस्ट ठाणे, 3). शायद अन्वर बिराजदार वय-33 वर्ष रा. लामजना ता. औसा जि. लातूर या तिन्ही आरोपींना जेरबंद केले असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का ? याचा देखील वडवणी पोलीस तपास करत आहेत. सदरील कार्यवाही प्रभावी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक शाम गायकवाड, सहाय्यक फौजदार तांदळे, कापले, पोह. खरात, उबाळे, सिद्दिकी, ढोबळे, ढवळे, कानतोडे, नाईकवाडे, करे यांनी यशस्वीरित्या कर्तव्य पार पाडली आहेत.








