बीड (रिपोर्टर) लग्नाला जाण्याच्या घाईत घराचा दरवाजा बंद करण्याचे विसरल्याने अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेवून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख असा एकूण 92 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात ज्योतीराम नवनाथ अंजाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ज्योतीराम नवनाथ अंजाम (रा.सनगाव ता. अंबजोगाई) हे काल दि.21 रोजी दुपारी 1.30 ते 2 च्या दरम्यान सहकुटूंब लग्नाला गेले होते. लग्नाला जाण्यापूर्वी त्यांनी घराचा दरवाजा बंद केला नव्हता. याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत त्यांच्या घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले नगदी रक्कम व सोन्याचे दागिणे असा 92 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.