गेवराई पोलिसांत दोघाविरोधात गुन्हा
गेवराई (रिपोर्टर) शहरात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला तोंडाला रुमाल बाधून बळजबरीने बीड या ठिकाणी नेऊन तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तर दुसरी घटना तालुक्यातच घडी असून 35 वर्षीय महिलेवर चालकाने आत्याचार केला दोन्ही घटने प्रकरणी संबधित आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलिवर आत्याचार करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत सविस्त माहिती अशी की , रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहाण असे या दोन अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत पिडीत अल्पवयीन मुलगी ही मुळ अंबड तालुक्यातील आहे तसेच नागझरी या ठिकाणी तीचे आई वडिल शेतात सालाने कामकाज करतात तसेच ( दि 29 रोजी ) पिडीता ही तिच्या चुलती सोबत गेवराईला कपडे खरेदी करण्यासाठी आली होती. याच वेळी आरोपी ने पिडीतेच्या तोंडाला रुमाल लाऊन बळजबरीने बीडला घेऊन गेले व एका कॉफीशॉपमध्ये नेऊन तिच्या ईच्छेविरूद्ध तिनवेळा बलात्कार केला असल्याची तक्रार पिडीतेने गेवराई पोलिसांत तक्रार दिली असुन दोन आरोपी विरूद्ध बालसंरक्षण कायदा , लैंगिक अत्याचार , अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी सोप्नील राठोड करत आहेत. दुसरी बलात्काराची घटना तालुक्यात घडली. नारायन तुकाराम गव्हाणे रा. चिखली ता. गेवराई याने गढी येथील 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.