परळी (रिपोर्टर) परळीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. एका पिकअमपमधून गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एक पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये 59 हजार 803 रूपयाचा गुटखा मिळून आला.
परळी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परळीमधून गुटख्याची तस्करी होते. बाहेरून आलेला गुटखा परळी शहरात आणि ग्रामीण भागात त्याची विल्हेवाट लावली जाते. असाच एक पिकअप क्रमांक एम.एच.44 यु.0585 मधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई अप्पर पोलिस अधिक्षकाच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये 59 हजार 803 रूपयाचा गुटखा आणि पिकअप असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अनिल दौंड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिसात नामदेव रघुनाथ मुंडे रा.विद्यानगर परळी आणि गफ्फार मुकदूम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.