रमाकांत गायकवाड,अक्षय विधाते । आष्टी
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे स्वप्न तीन पिढ्याने पाहितलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हावासियांना रेल्वेचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले होते. आज खर्या अर्थाने मुंडेंचं स्वप्न साकार झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आष्टी-अहमदनगर प्रवासी रेल्वेचा शुभारंभ झाला. या वेळी मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या महत्वपुर्ण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
रमाकांत गायकवाड,अक्षय विधाते । आष्टी
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे स्वप्न तीन पिढ्याने पाहितलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हावासियांना रेल्वेचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले होते. आज खर्या अर्थाने मुंडेंचं स्वप्न साकार झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आष्टी-अहमदनगर प्रवासी रेल्वेचा शुभारंभ झाला. या वेळी मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या महत्वपुर्ण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
व्यासपीठावर या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, खा. सुजय विखे, नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, शिवाजीराव कर्डिले, संग्राम जगताप, राजेंद्र मस्के, सविता गोल्हार, विजय गोल्हार, जयदत्त धस, अजय धोंडे, नगराध्यक्ष पल्लवी धोंडे, रेल्वेचे जी.एम. लाहोटी, सोलापूर रेल्वेचे शैलेश गुप्ता यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हे मुंडेंचे स्वप्न 25 टक्केच साकार करत आहोत. ज्या दिवशी परळीपर्यंत ही रेल्वे धावेल त्यादिवशी पुर्ण स्वप्न साकार होईल. नगर-बीड-परळी ही रेल्वे बीड जिल्ह्याच्या विकासाची वाहिनी ठरणार आहे. आमचं सरकार आल्या आल्या या मार्गाला 242 कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारचा 50 टक्के हिस्सा यापैक एक दमडीही दिली नव्हती. त्यामुळे आजची रेल्वे ही विलंबाने धावत आहे. या रेल्वे प्रकल्पाबरोबर राज्यातले अन्य प्रकल्प पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचे आम्हाला पुर्ण सहकार्य मिळत आहे. त्यासोबत आर्थिक बजेट मिळत आहे. त्यामुळे राज्यात इतर रखडलेले प्रकल्पही मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा आहे. मोठ्या संघर्षानंतर आज बीडमध्ये रेल्वे आली आहे. या रेल्वे मार्गासाठी अनेकांनी संघर्ष केला. मात्र सर्वात जास्त संघर्ष आणि प्रयत्न हे स्व. गोपीनाथ मुंडेंनी केले. स्व. मुंडेंना खरी श्रध्दांजली ही आजची रेल्वे ही परळीपर्यंत गेल्यानंतरच ठरेल. मार्च 2023 पर्यंत बीडपर्यंतचे रेल्वेचे पुर्ण काम होईल. 2024 पर्यंत बीडपर्यंत रेल्वे धावेल. यात आम्हाला कुठलीही शंका नाही. महाविकास आघाडी सरकारने रेल्वेमधला 50 टक्केचा हिस्सा बंद केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर कॅबिनेटच्या दुसर्या बैठकीमध्ये आम्ही लागोलाग हा जीआर बंद करून बीड रेल्वेला 242 कोटी देण्याचा निर्णय घेऊन ते वितरीत केले. या मार्गाचे 96 टक्के भूसंपादन पुर्ण केले आहे. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मुंडे साहेब आणि मी गेल्या 42 वर्षांपासून राजकारणात सोबत होतो. त्यांनी आणि मी एकाच वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी लढवली आणि निवडूनही आलो. त्यामुळे मुंडेंच्या मनात आणि माझ्या मनात काय आहे हे दोघांनाही कळायचे. मुंडेंच्या मनात काय आहे हे मी ओळखायचो, म्हणूनच नगर-बीड-परळी हे मुंडेंच्या मनातलं स्वप्न मी ओळखलं होतं. मुंडे साहेब जेव्हा देशाचे ग्रामविकास मंत्री झाले त्या वेळेस मोदीजींची भेट घेऊन त्यांनी पहिल्यांदा प्राधान्याने या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला होता. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासोबत परळी ते नगर इलेक्ट्रीशीयनच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. आजची धावणारी रेल्वे ही डिझेलवर धावणारी आहे. त्यामुळे ही खर्चीक पडत आहे. ज्या दिवशी इलेक्ट्रीशीयनचे काम पुर्ण होईल, तेव्हा आजच्या खर्चात 70 टक्के कपात होईल.
परळीपर्यंत रेल्वे नेण्यासाठी हजार-हजार कोटींच्या निधीची उपलब्धता करा
नगर-बीड-परळी हा बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चीत रेल्वे मार्गाचे अर्धवट काम पुर्ण होऊन न्यू आष्टीपासून आजपासून नगरला रेल्वे धावली आहे. झुक..आगीन गाडी ही तीन पिढ्यांची जिल्हावासियांची मागणी अर्धवट पुर्णत्वाकडे गेली. मात्र अर्धे हुक अद्यापही अडकलेले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने आष्टी ते परळी हा रेल्वे मार्ग जेवढा लवकर होईल तेवढा करून खरचं बीड जिल्ह्याच्या विकासात हातभार लावायचा असेल तर हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्याने दोनशे-अडीचशेपेक्षा हजार-हजार कोटींचा तात्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.












