परळी (रिपोर्टर) परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकत दहा ते बारा जुगार्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईल-दुचाकीसह रोख रक्कम जप्त केले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.
परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जुगार्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन चक्रीसह मटक्याचे अड्डे सुरू केल्याची माहिती परळी शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकत जुगार्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, दुचाकी, मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेप्रमुख उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.