आसरडोह परिसरात घेतली फाशी; आत्महत्येचे कारण समजले नाही
धारूर (रिपोर्टर) कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवरील मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आसरडोह परिसरातील तलावाजवळ घडली. या घटनेने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला होताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
नितीन पाटोळे (वय 36 वर्षे) हे कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांनी आसरडोह परिसरातील तळ्याजवळ एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती धारूर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मुख्याध्यापकाच्या या आत्महत्येने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पाटोळे यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले नव्हते. या प्रकरणाचा अधिक तपास धारूर पोलीस करत आहेत.