बीड (रिपोर्टर): कारखाण्यावरुन घरी आलेल्या एका उसतोड मजूर आणि त्याच्या पत्नीला मारहाण करुन जातिवाचक शिविगाळ केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील वारोळा येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांगदेव रामभाऊ गायकवाड यांनी उसतोडणीला जाण्यापूर्वी दोन लाख रुपये उच्चल घेतली होती. मात्र एक महिण्यापूर्वी ते गावाकडे आले. 21 मार्च रोजी ते घरी असतांना लक्ष्मण राधुभाऊ तौर, व रामराजे राधुभाऊ तौर यांनी गायकवाड यांच्या घरासमोर येवून तुम्ही कारखाण्यावरुन कसे काय आले म्हणत जातिवाचक शिविगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी चांगदेव गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.