कडा (रिपोर्टर) : चालकाचा ताबा सुटून अनियंत्रित टेम्पो आठवडी बाजार घेऊन गावाकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहणार्या तरुणाच्या अंगावरून गेल्याची घटना 2 एप्रिल रोजी केरूळ येथे झाली होती. यात जखमी झालेल्या तरुणाचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सत्यवान बबन साबळे (32) असे मृताचे नाव आहे. पत्नीच्या समोरच या तरुणाच्या अंगावरून टेम्पो गेला होता.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील सत्यवान बबन साबळे हे पत्नीसह रविवारी कडा येथील आठवडी बाजारासाठी आले होते. त्यानंतर केरूळ गावाकडे जाण्यासाठी चौकात दोघेही रिक्षाची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, बावर गॅस एन्जसीचा सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पो या मार्गावरून जात होता. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टेम्पो सत्यवान यांच्या अंगावरून गेला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. आज पहाटे उपचारादरम्यान सत्यवानचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी,दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे.