बीड (रिपोर्टर) : दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार यांनी सरपंचपद स्वीकारून अडीच वर्षाच्या कालावधीत अनुसूचीत जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाला सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी त्यांना अपात्र केले.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ही मोठी ग्रामपंचायत आहे, राजकीयदृष्ट्या दिंद्रुड जिल्हा परिषद गट आणि ग्रामपंचायतीला महत्व आहे. या गावचे सरपंचपद हे अनुसुचीत जमातीसाठी राखीव आहे. अजय कोमटवार हे खुल्या प्रवर्गातून निवडून येऊन राखीव असलेल्या सरपंचपदावर विराजमान झाले होते. ते खुल्या प्रवर्गातून निवडून आल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व टिकून राहिले आहे. मात्र सरपंचपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक असतानाही अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाला न दिल्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी त्यांना सरपंचपदापासून अपात्र ठरवले आहे.