Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमसार्वजनिक ओढा बुजवला पाच जणांवर आष्टी पोलीसात गुन्हा दाखल

सार्वजनिक ओढा बुजवला पाच जणांवर आष्टी पोलीसात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- तहसीलदारांनी आदेश देवून बुजवलेला ओढा मोकळा करून घेतला होता. पुन्हा तो ओढा बुजवला तर गंभीर गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली होती. तरी देखिल तहसीलदारांचे आदेश धुडकावत सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांनी सार्वजनिक ओढा बुजवला. या प्रकरणी पाच शेतकर्‍यांविरोधात आष्टी पोलीसात तलाठ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आष्टीचे तहसीलदार यांनी आदेश देवून सांगवी पाटण येथील सर्व्हे नं.११८ मधील ओढ्याच्या व रस्त्याच्या वहीवाटीस कायमस्वरूपी कसलीही अडचण करण्यास मनाई आदेश काढले होते. ओढा व रस्ता पुर्वीप्रमाणे करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्तात ३० फुट ओढा काढुन देण्यात आला होता. मात्र त्यानंतर राजेंद्र अर्जुन भोसले रा.सांगवी व इतर नऊ सर्व रा.पाटण सांगवी यांनी सदरचा ओढा बंद केला असल्याचा अर्ज तहसील कार्यालयाला दिला होता. तहसीलदारांनी या प्रकरणाची पाहणी करून ओढा बुजवणार्‍या सुधीर अजीनाथ भगत, पार्वती अजीनाथ भगत, आसाराम जगन्नाथ भगत, लक्ष्मण भगत, जगन्नाथ नामदेव भगत यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात तलाठी भाऊसाहेब शांताराम कावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राख हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!